महिला प्रवाशाकडे तिकीट नसल्यास रेल्वेतून उतरवले जाणार नाही
स्लिपर क्लासमधलं तिकीट असताना महिला एसी कोचमधून प्रवास करत असेल, तरी सुद्धा तिकीट तपासनीस तिला एसी कोचमधून बाहेर काढू शकणार नाही.
मुंबई : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आता महत्त्वाची बातमी. प्रवासी महिलेकडे तिकीट नाही या कारणावरुन, तिकीट तपासनीस संबंधित महिलेला रेल्वे डब्यातून आता उतरवू शकणार नाही. रेल्वे नियमावली १९८९ मधल्या तरतुदीनुसार या नियमाचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश रेल्वे बोर्डानं दिले आहेत. एवढंच नाही तर महिलेचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि ती महिला कोचमधून प्रवास करत असेल तरी तिला तिकीट तपासनीस डब्यातून उतरवू शकणार नाही. तसंच स्लिपर क्लासमधलं तिकीट असताना महिला एसी कोचमधून प्रवास करत असेल, तरी सुद्धा तिकीट तपासनीस तिला एसी कोचमधून बाहेर काढू शकणार नाही.