COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील गुंठेवारीतील लाखो बांधकामे नियमित होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या अंतर्गत खाजगी जमीन एनए न करता आणि योजना संमत न करता झालेले बांधकामे नियमित होणार आहेत. 


गरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आलाय. 


या आधी 2001 सालापर्यंतची अशी बांधकामे नियमित करण्यात आली होती आता डिसेंबर 2020 पर्यंतची बांधकामे नियमित होणार आहेत.


आगामी महापालिका, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतलाय. मात्र यामुळे लाखो गरिब आणि सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.