मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapchi Shivaji Maharaj) स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती येत असल्याने शिवप्रेमी संतापले आहेत. सर्च इंजिन असलेल्या गुगलवर आरमाराचे प्रमुख कोण असं सर्च केल्यावर कान्होजी आंग्रे नाहीतर समुद्री चाचे असं येत आहे. (Google insulted Shivaji maharaj Mavala Kanhoji Angre marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. कान्होजी आंग्रे यांनी स्वराज्यावर परकीयांनी केलेली आक्रमण परतावून लावलीत. त्यासोबत कित्येक मोहिमा फत्ते केल्या, या मातब्बर स्वराज्यरक्षकाबाबत गुगलवर सर्च केल्यावर चुकीची माहिती आल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणं साहजिकच आहे. 


स्वराज्य उभारणी त्यानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी कित्येकदा आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सरदाराविषयी गुगल 'पायरेट' म्हणून दाखवत आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू असून शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.  


छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलात त्यावेळी 5 हजार सैनिक होते. एकदा मराठ्यांनी कोकणात प्रवेश केल्यावर त्यांची थेट लढाई युरोपीयांशी, प्रामुख्याने पोर्तुगीजांशी झाली. पण तरीही छत्रपती शिवाजींनी कान्होजी आंग्रे यांच्या मदतीने पोर्तुगीजांविरुद्ध केलेल्या शूर मोहिमेने सागरी लढाईत देखील आपलं कौशल्य दाखवून दिलं होतं