राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतील ध्वजारोहण
६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतील शिवाजी पार्क इथे ध्वजारोहण करण्यात आलंय.
मुंबई : ६९ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुंबईतील शिवाजी पार्क इथे ध्वजारोहण करण्यात आलंय.
विविध दलांची मानवंदना
यावेळी विविध दलांची त्यांनी मानवंदनाही स्वीकारली. यात बृन्मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, तटरक्षक दल, नौसेना, होमगार्ड, स्काऊट गाईड, राज्य उत्पादन शुल्क, एनसीसी, एमसीसी या पथकांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री विनोद तावडे, राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची उपस्थित होती.