मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, आमच्या माहितीनुसार राज्यात कुठल्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे केलेली नाही, यासाठी राजभवनाने पत्र देखील काढलं आहे. आम्हाला आज रात्री साडेआठ पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे, सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी, या दावा करण्यासाठी आमची काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नसल्याचंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे, राष्ट्रपती राजवट लागू केली तरी एवढा ताण घेण्याचं कारण नाही. कारण तीन पक्ष एकत्र येऊन, संख्याबळ एवढा आकडा घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला, तरी देखील राज्यपालांना घटनेनुसार संबंधित पक्षाला संधी द्यावी लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.