दुष्काळाचे निकष बदलले, शेतकऱ्यांना मदत नाही?
राज्यात नऊ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने या गावातील शेतकर्यांना कोणताही सरकारी मदत मिळणार नाही आहे.
दीपक भातुसे, मुंबई : राज्यात नऊ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने या गावातील शेतकर्यांना कोणताही सरकारी मदत मिळणार नाही आहे.
खरीप हंगामातील ९ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारच्या नव्या निकषांमुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे दुरापास्त झालं आहे. केंद्र सरकारच्या सुधारित दुष्काळी मॅन्यूअलनुसार आणेवारीचे निकष कालबाह्य ठरवण्यात आले आहेत.
नव्या निकषांमुळे आणेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही मदत मदत मिळणार नाही. केंद्राच्या दुष्काळी मॅन्यूअलमधील निकषानुसार शेतकर्यांना अडचणीत मदत करणे शक्य नसल्याचे राज्य सरकारचेही मत आहे. निकषात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला विनंती करणार आहे. केंद्राला पाठवण्याचा प्रस्ताव हा मदत व पुनर्वसन विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे.