शेतकरी धर्मा पाटील यांच्याबाबत सरकारला उशीरा जाग
धर्मा पाटील यांना पंधरा लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देणार आहे.
मुंबई : जे. जे. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकरणात अखेर सरकारला जाग आलीय. झी मीडियाने याबाबतची बातमी लावून धरल्यानंतर सरकार धर्मा पाटील यांना पंधरा लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत आश्वासन दिलंय.
शेतकऱ्यांच्या जमीनीबाबत विशेष बाब
भूसंपादन कायद्यामध्ये तरतूद नसली तरी विशेष बाब म्हणून शासनाच्या ताब्यात असलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनीबाबत विशेष बाब म्हणून सानुग्रह अनुदान रूपाने पैसे देण्यात येत असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. मात्र सरकारने धर्मा पाटील यांना आधीच मोबदला दिला असता तर असा सवाल आता विचारण्यात येतोय.