मुंबई : ओबीसी आरक्षणाचा (OBC RESERVATION) मुद्दा लागण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी स्वाक्षरी केली आहे. याआधी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला होता. त्यावर राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्यात राज्य सरकारने सुधारणा करत सुधारित अध्यादेश पुन्हा राज्यपालांकडे पाठवला. यावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांनी ही फाईल आता राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्याकडे पाठवली आहे. त्याआधी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत ओबीसी मुद्द्यावर चर्चा झाली. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याचं पाहिला मिळतंय. 


तांत्रिक गोष्टी पूर्ण करुन अध्यादेश तात्काळ काढला जावा, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यापूर्वी अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर व्हावं अशी सर्वांचीच भूमिका आहे, त्यामुळे राज्यपालांकडूनही आज अध्यादेशावर तात्काळ स्वाक्षरी करण्यात आली. राज्यापाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.