बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण
बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena founder Balasaheb Thackeray ) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Grand statue of Balasaheb Thackeray) अनावरण आज सायंकाळी ६ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, फोर्ट येथे होणार आहे.
मुंबई : दिव्ंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena founder Balasaheb Thackeray ) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Grand statue of Balasaheb Thackeray) अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी ६ वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, फोर्ट येथे होणार आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने संध्याकाळी सहा वाजता कुलाबा इथे हा कार्यक्रम होत आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर बाळासाहेब ठाकरे (Grand statue of Balasaheb Thackeray) यांचा हा पुतळा बसवण्यात आला आहे.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्यावेळी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतराचे पालन या कोविड १९ मार्गदर्शक बाबींचे कृपया योग्यरित्या पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वर्दळीचा परिसर तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षितता लक्षात घेता कृपया प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस यंत्रणा यांना आवश्यक आणि योग्य ते सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.