मोठी बातमी... मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा
लोकलने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. पण आता 2 डोस पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2 डोस पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी लोकलचं तिकीट मिळणार आहे.
याआधी फ्कत पासच मिळत होता. मात्र, आता लोकल प्रवास करण्यासाठी तिकीट मिळणार आहे. त्यामुळे मुंबई करांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर 2 डोस पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना एक दिवसाचा प्रवास करता येणार आहे.
राज्य सरकारने पश्चिम आणि मध्य रेल्वेला तसं पत्र पाठवलं आहे. राज्य सरकरच्या या निर्णयाची आंबलबजावणी केव्हापासून सुरू होणार हे अद्याप कळू शकलेलं नाही. संबंधित माहिती सरकारकडून घ्यावी लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व मुंबईकर रेल्वेने प्रवास कधी करता येणार या प्रतिक्षेत आहेत.