`जीएसबी` मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरूवात!
मुंबईतील सार्वजनिक मंडळांपैकी `जीएसबी` गणेशमंडळ हे अनेक कारणांसाठी लोकप्रिय आहे. सोन्या-चांदीने मढलेला, पाच दिवसांच्या मुक्कामाला येणारा `जीएसबी`चा गणपती यंदा पाच दिवसांच्याऐवजी सहा दिवसांच्या मुक्कामानंतर परतीच्या वाटेवर निघाला आहे.
मुंबई : मुंबईतील सार्वजनिक मंडळांपैकी 'जीएसबी' गणेशमंडळ हे अनेक कारणांसाठी लोकप्रिय आहे. सोन्या-चांदीने मढलेला, पाच दिवसांच्या मुक्कामाला येणारा 'जीएसबी'चा गणपती यंदा पाच दिवसांच्याऐवजी सहा दिवसांच्या मुक्कामानंतर परतीच्या वाटेवर निघाला आहे.
मुंबईत काल दिवसभर झालेल्या तुफान पावसानंतर सगळीकडे पाणी तुंबले होते. अशावेळेस जीव धोक्यात घालून आणि मुंबईची परिस्थिती अधिकच बिकट होईल असे प्रकार टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.
माटुंगा पोलिस आणि ट्राफिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत जीएसबी मंडळानेदेखील त्यांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन काही तासांनी पुढे ढकलले. एरवी पाच दिवसांच्या मुक्कामासाठी येणारे बाप्पा आज सहा दिवसांनंतर विसर्जनासाठी निघाले आहेत. सुमारे १२ तासांच्या भव्य मिरवणूकीनंतर 'जीएसबी' च्या गणेशमूर्तीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन केले जाते.
अडकलेल्या मुंबईकरांना दिला आधार
तुफान पावसामुळे किंग्ज सर्कल. सायन, माटुंगा परिसरात अडकलेल्यांना नागरिकांना काल जीएसबी मंडळाने आसरा दिला. त्यांना मोफत राहण्याची, खाण्याची सोय मंडळातर्फे करण्यात आली होती.