जीएसबीच्या गणरायाचा सोन्या चांदीचा शृंगार
अगदी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
मुंबई : सर्वाधिक श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या जीएसबी सेवा मंडळाचं यंदा ६३ वं वर्ष आहे. अगदी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. जीएसबीच्या गणरायाची वेगळी ओळख म्हणजे सोन्या चांदीचा शृंगार.
जीएसबीच्या गणपतीला तब्बल ८० किलो सोनं आणि ५०० किलो चांदीचा चढावा करण्यात आलाय. त्याच्यासाठी तब्बल २६४.२५ कोटी रुपयांचा विमा, ज्यात गणरायाची मुर्ती, मंडप, भाविक, भटजी, कारागीर यांचा समावेश आहे.
तर केवळ मूर्तीचाच विमा १८ कोटी रुपये आहे. ४८ सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दिवसभरात ४२ पद्धतीने पूजा होत आहेत. तसंच गणरायाची तुलाही केली जाणार आहे.