मुंबई : घाटकोपर बॉम्ब स्फोटमधील संशयित आरोपी अब्दुल रेहमान शेखला गुजरात एटीएसच्या विशेष पथकाने मंगळवारी औरंगाबादमधून अटक केलीय. त्याचे वय ४३ वर्षे आहे. गेल्या काही वर्षांपासून या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्या पत्नीवर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एटीएस आणि पोलिसांच्या टीमनं सापळा रचून ठेवला होता.


आरोपी नजरेस पडताच त्याला अटक करण्यात आलीय. अत्यंत गोपनीथ पद्धतीने ही कारवाई करण्यात आलीय. आरोपी २००२ नंतर सौदी अरेबियात सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होता.