मुंबई : भाजीपची ही विजयाची खात्री की अतिआत्मविश्वासातून केलेली घाई असा प्रश्न राज्यातील राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. कारण, प्रत्यक्ष मतमोजनीला सुरूवात होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबईतील भाजपच्या पक्षकार्यालयाबाहेर झळकले आहेत.


पक्षकार्यालयाबाहेर विजयापूर्वीच जल्लोष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सकाळी आठ वाजेलपासून प्रत्यक्ष मतमोजनीला सुरूवात होत आहे. काही वेळ मतमोजनी झाल्यानंतर प्राथमीक अंदाज हाती येऊ शकतील. पण, भाजपला विजयाची इतकी खात्री दिसत आहे की, त्यांनी पक्ष कार्यालयही सजवून ठेवले आहे. तसेच, पक्ष कार्यालयाबाहेर पोस्टर्स झळकवली आहेत. त्यावर ‘गुजरात-हिमाचल भाजपा की जीत’असे शब्द झळकत आहेत. इतकेच नव्हे तर, कार्यालयाबाहेर एक व्यासपीठही तयार आहे. बॅनरच्या एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे फोटो आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत.


मुंबईसोबत पुण्यातही विजयापूर्वी जल्लोष


भाजपचा विजयापूर्वीचा जल्लोष हा काही मुंबईतच नव्हे तर, पुण्यातही पहायला मिळतो आहे. पुण्यातही विजयी देखावा तायर करण्यात आला आहे. या या देखाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपाठावर उभे राहून भाषण ठोकतायत असा तो देखावा आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्यक्षात काय निकाल लागणार हे स्पष्ट व्हायला अद्याप काही तासांचा आवधी आहे. मात्र, तोपर्यंतच भाजपने जल्लोषाची तयारी केलेली पहायला मिळत आहे.