मुंबई : 1993 सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अहमद मोहम्मद लंबा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. गुजरात एटीएसने राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यातील धारिया भागातून लंबूला अटक केली. फारुख टकलानंतर लंबाची केलेली अटक महत्वपूर्ण मानली जात आहे. लंबाला सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.