हार्बर रेल्वेचा खोळंबा, माहीमला डबे घसरले
लगबगीच्या वेळी हार्बरचा रेल्वेचा चांगलाच खोळंबा झालाय. माहिमला रेल्वेचे चार डबे घसरल्याचं समजतंय.
मुंबई : लगबगीच्या वेळी हार्बरचा रेल्वेचा चांगलाच खोळंबा झालाय. माहिमला रेल्वेचे चार डबे घसरल्याचं समजतंय.
हार्बर रेल्वे मार्गावरील अंधेरी - सीएसटी ट्रेनचे चार डबे घसरलेत. माहीमजवळ ही घटना घडलीय. मध्य रेल्वे मार्ग मात्र सुरळीत सुरू आहे. दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय परंतु, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कशी घडली दुर्घटना
आज सकाळी ९.०७ वाजता सीएसएमटीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले. ही लोकल ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणं अपेक्षित होते, मात्र ७ नंबरच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ट्रकवरुन ५ नंबरचा ट्रॅक बदलताना लोकलचे चार डबे घसरले आणि अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या तीन प्रवाशांमध्ये १ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे
रेल्वेचे डबे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.