मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियमवादक 'पद्मश्री' पंडित तुळशीदास बोरकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


पद्मश्रीनं गौरव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातील बोरी या गावी त्यांचा जन्म झाला. गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे धडे गिरवले. 


उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, राजन-साजन मिश्रा आदी कलावंतांना त्यांनी संवादिनीची साथ केली .हार्मोनियमबरोबरच ऑर्गनवरही त्यांचं प्रभुत्व होतं. 


शास्त्रीय संगीतक्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल २०१६ साली त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.