मुंबई : आजचा दिवस हा माझ्यासाठी ऐतिहासिक असून आता भाजपाशिवाय पर्याय नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. राज्यात पाच वर्षे आपण मुख्यमंत्र्यांचे कणखर नेतृत्व पाहीले, दुष्काळ - पूर याठिकाणी लोकांनां मदत मिळाल्याचे ते म्हणाले. आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्यांना मदत करावी अशी अपेक्षा हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हर्षवर्धन यांनी योग्यवेळी पक्षप्रवेश केला. एन अनुभवी नेता असल्याने पक्षाला बळकटी येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन यांचे कौतुक केले. 



हा निर्णय लोकसभेच्या दोन दिवस जरी आधी केला असता तर बारामती जिंकलो असतो. सुप्रिया सुळे यांनी घरी पाठवायचे होते मात्र ते झालं नाही अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. हर्षवर्धन यांनी जरा निर्णय तेव्हा घेतला असता तर ते झालं असतं. ते हुशार राजकारणी आहेत, लोकसभेचा निकाल लागल्यावर बघू असं त्यांनी तेव्हा ठरवलं होतं नाहीतर ते तेव्हाच भाजपात आले असते असेही ते म्हणाले. युतीचेच सरकार येणार, मोठ्या बहुमताने येणार. आधी घोषणा केली होती की अब की बार 220 पार, आता ही घोषणा मागे पडली आहे. हर्षवर्धन यांना आश्वस्त करतो की त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असेही त्यांनी आश्वस्त केले.