मुंबई : काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. यावेळी दादर परिसरात हॉकर्सच्या मुद्दयावरून झालेल्या राड्यानंतर दादर परिसरात रस्ते हॉकर्समुक्त झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल्फिन्स्टन रोडवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपात मोर्चा काढल फेरीवाला हटावचा नारा दिला. तसा १५ दिवसांचा अल्टिमेटम रेल्वे प्रशासनाला दिला. १६ दिवशी मनसे आक्रमक झाली आणि खळ्ळ खट्याक करुन दाखवले. त्यानंतर वाद पेटला. फेरीवाल्यांनीही मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आणि वाद अधिकच चिघळला. काँग्रेसने फेरीवाल्यांच्या बाजुने उडी घेतल्यानंतर वाद वाढला. मात्र, आज दादर परिसरात हॉकर्सच्या मुद्दयावरून झालेल्या राड्यानंतर दादर परिसरात रस्ते हॉकर्समुक्त झाले आहेत. 


निरुपम यांची फेरीवाला सन्मान मोर्चाकडे पाठ 


मुंबईत काँग्रेसनं आयोजित केलेल्या फेरीवाला सन्मान मोर्चात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पाठ दाखवली. फेरीवाल्यांची बाजू घेत मनसेवर तोफ डागताना मनसेची गुंडागर्दी सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी भडक वक्तव्य करत फेरीवालेही तसेच उत्तर देतील, अशी भाषा करत मेळावा घेतला. त्यानंतर मालाडमध्ये याचे पडसाद दिसून आले. मनसेच्या तीन ते चार कार्यकर्त्यांवर प्राण घातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.


अचानक मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला


मनसेला उत्तर देण्यासाठी आज दादर येथे फेरीवाल्यांचा मोर्चा काढण्याचा निर्धारही केला. मात्र, मोर्चा निघाला असताना निरुपम यांनी पळ काढल्याचे दिसून आले. निरुपम यांच्या गैरहजेरीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. आधी स्टार मॉलपासून कबुतरखान्यापर्यंत मोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी दिली होती.  मात्र, अचानक मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला. 


दरम्यान, काँग्रेसने आयोजित केलेल्या फेरीवाल्यांच्या मोर्चाआधी दादरमध्ये मनसे आणि काँग्रेसचे  कार्यकर्ते आमने-सामने आले. काही वेळापूर्वीच दादरमध्ये काँग्रेसच्या मोर्चा आयोजकांची गाडीही फोडण्यात आलीय. अकराच्या सुमारास काँग्रेस आयोजित मूक मोर्चासाठी अनेक फेरीवाले आणि काँग्रेस कार्यकर्ते नक्षत्र मॉलच्या परिसरात जमू लागले. त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही मोर्चाला विरोध करण्यासाठी तिथे आले. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. 


पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात


मोर्चाच्यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात होताच. त्यामुळे दोन्ही बाजूनं आक्रमक असणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा पोलिसांनीपर्यंत केला. त्यानंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे.