मुंबई : मुंबई फेरीवाल्यांनी ठरवून दिलेल्या जागेतच व्यवसाय करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. फेरीवाल्यांना कुठेही व्यवसाय करू देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेच्या पादचारी पुलांवर फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नसल्याचं न्यायलयानं स्पष्ट केले आहे. रेल्वे स्टेशन, मनपा मंडई १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आलीय.  तसंच शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालयं यांच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्यात आलीय. 


न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना दणका बसलाय. मुंबईत फेरीवाल्यांना कुठेही व्यवसाय करण्यास परवानगी देण्यासाठी संजय निरुपम यांनी याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावलीय. 


आज मुंबईत काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी राडा पाहायला मिळाला. काँग्रेसने आयोजित केलेल्या फेरीवाल्यांच्या मोर्चाआधी दादरमध्ये मनसे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. काही वेळापूर्वीच दादरमध्ये काँग्रेसच्या मोर्चा आयोजकांची गाडीही फोडण्यात आलीय.  अकराच्या सुमारास काँग्रेस आयोजित मूक मोर्चासाठी अनेक फेरीवाले आणि काँग्रेस कार्यकर्ते नक्षत्र मॉलच्या परिसरात जमू लागले. त्याचवेळी मनसेचे कार्यकर्तेही मोर्चाला विरोध करण्यासाठी तिथे आले आणि बाचाबाची झाली.


दरम्यान, रेल्वे पादचारी पुलांवर व्यवसाय करता येणार नाही असे स्पष्ट करताना परवानगी नसलेल्या क्षेत्रात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच शाळा, धार्मिक स्थळं, रुग्णालाच्या १०० मीटर परिसरातही मनाई करण्यात आली आहे. तर ज्या मुद्द्यावरुन रान उठले त्या रेल्वे स्टेशन, मनपा मंडई १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई करण्याता आली आहे.