मुंबई : दिवाळीच्या तोंडावर ठाण्यातील घोडबंदर आणि पुण्याच्या बालेवाडी भागातील नवीन बांधकामांवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे नवीन घरात लोकांना प्रवेश करता येणार आहे. त्याचसोबत नवीन समिती स्थापन केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही समिती दर दोन महिन्यांनी या भागातील विविध पाणी पुरवठा आणि नवीन बांधकाम यांच्या नियोजनाचा आढावा घेऊन अहवाल सादर करेल, असेही आदेश न्यायालयाने दिलेत. पालिका प्रशासन शहरीकरणाचा विस्तार करण्याच्या नावाखाली दूरवरच्या ठिकाणी मोठ मोठ्या इमारतींना परवानगी देत आहे. 


मात्र त्या इमारतींना पाणी पुरवठा करण्यात ते अपयशी ठरतायत. ज्याचा परिणाम शहरातील उर्वरीत लोकवस्तीवर होतो. हे थांबायला हवं असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं. याच सुनावणी दरम्यान ठाण्यातील घोडबंदर आणि पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील बालेवाडी आणि बाणेर येथील नवीन बांधकामांना न्यायालयाने  स्थगिती दिली होती.