दहावी बारावी बोर्डाची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; ...तर थेट नापास व्हाल
SSC EXAM | HSC EXAM | कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाने दणका दिला आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत आतापर्यंत 41 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.
मुंबई : कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाने दणका दिला आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत आतापर्यंत 41 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी बहाद्दर सापडल्याने शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी कॉपी करणा-या तीन विद्यार्थ्यांना अटकही करणअयात आलीय.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला एकाच दिवसात 41 कॉपी बहाद्दर विद्यार्थी सापडले. राज्यात नऊ विभागीय मंडळात बारावीची परीक्षा सुरु आहे
दररोज काहीना काही गैरमार्ग प्रकरणे आढळून येत आहेत.
रसायनशास्त्र, एमसीव्हीसी पेपर क्रमांक 1 मध्ये 27 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.
औरंगाबादमध्ये 15, मुंबईत 1, अमरावती 8, नाशिक 1, लातूर 2 अशी प्रकरणे आढळून आली.
राज्यशास्त्र विषयात 14 कॉपीची प्रकरणे सापडली. अमरावती विभागात सर्वाधिक 12, औरंगाबाद 1, लातूर 1 याप्रमाणे प्रकरणांचा समावेश
याबाबतची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.
HSC Exam | बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक
बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत आहे. परंतू तरीही मुंबईत बारावीचा रसायन शास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.
विलेपार्ले पोलिसांनी ही कारवाई केली असून, व्हॉट्सअॅप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आली आहे. पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांनीचीही चौकशी करण्यात आली आहे.