HDFCकडून व्याजदरात कपात, कर्जाचा व्याजदर कमी होणार
प्रायव्हेट सेक्टरमधील मोठी बँक एचडीएफसी लिमिटेडने आपल्या फ्लोटिंग लोनच्या व्याजदरात 10 बेसिक पाँईंटची कपात केली आहे.
मुंबई : प्रायव्हेट सेक्टरमधील मोठी बँक एचडीएफसी लिमिटेडने आपल्या फ्लोटिंग लोनच्या व्याजदरात 10 बेसिक पाँईंटची कपात केली आहे. भारतीय रिझर्व बँकेकडून व्याज दर कमी करण्याची घोषणा केल्यानंतर, व्याज दर कमी करण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेने घेतला आहे.
HDFCकडून व्याजदर कमी
HDFC बँकेकडून नवीन लोन घेणाऱ्यांना 8.25 ते 8.65 टक्के व्याजावर लोन देऊ शकते. या घटणाऱ्या व्याजदरांचा फायदा अशाच ग्राहकांना होणार आहे, ज्यांचं लोन फ्लोटिंग इंट्रेस्टवर सुरू आहे.
RBIकडून व्याजदरात कमी
आरबीआयने या वर्षात तिसऱ्या वेळेस आपल्या व्याजदरात 25 बेसिक प्वॉईंटची कपात केली आहे. आरबीआयच्या धोरणानुसार व्याज दरातील कपात ही मागील 9 वर्षात सर्वात कमी स्तरावर पोहचली आहे. केंद्रीय बँकेने अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न सुरू केले आहेत.
अनेक बँकांनी घटवले व्याजदर
RBI कडून व्याजदर कमी केल्यानंतर, रेपो रेट 5.50 टक्के झाला आहे. पहिल्यांदा हा 5.75 टक्के होता. आरबीआयने व्याजदर कमी केल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केली आहे.