मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी बेपत्ता प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. प्रमोशनच्या वादातून सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. सिद्धार्थ संघवी यांची हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सरफराज शेखनं हत्या केल्याची कबुली दिली आहे. कल्याणच्या हाजी मलंगच्या जंगलामध्ये मृतदेह फेकल्याचा संशय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचं उघड झालंय. नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीनं हत्येची कबुली दिलीये. सिद्धार्थ संघवी यांची गाडी नवी मुंबईत सापडली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी काही संशयितांना ताब्यत घेतलं होतं. यातील एकानं त्यांची हत्या केल्याची कबुली दिलीये. अधिक तपासासाठी या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलंय.


सिद्धार्थ संघवी हे एचडीएफसी बँकेच्या कमला मिल येथील कार्यालयात काम करायचे. बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी मलबार हिल येथून निघाले. पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह ते मलबार हिल येथे राहतात. रात्री दहापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सिद्धार्थ हे सायंकाळी साडेसातच्या सुमारास कमला मिल येथून निघाल्याचे सांगितले.


यानंतर सिंघवी यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान गुरुवारी त्यांची मारुती कार नवी मुंबईत सापडली. या कारमध्ये रक्ताचे डाग सापडले होते.