COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे मिळून यावर मार्ग काढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महाराष्ट्रातील तबलिकी समाजातील प्रमुख धर्मगुरुंसोबत नुकतीच महत्वाची बैठक झाली. मलबार हिल येथील जेतवन या आरोग्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली. 



राज्यातील धार्मिक सलोखा जपण्यासाठी प्रशासनाला सर्व समाजाने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. 



समाजिक सलोखा राखण्यासाठी समजला आवाहन करावे असे आवाहन यावेळी तबलिकी समाजातील प्रमुख नेत्यांना आरोग्यमंत्री टोपे यांनी केले. 


निझमुद्दीनल जे कोणी गेले होते त्यांनी जवळच्या रुग्णालयाला भेट देऊन तपासणी करावी, प्रशासनाला मदत करावी असे आवाहन यावेळी टोपे यांनी केले.


२४ तासात ११३ रुग्ण 


राज्यात गेल्या तासांमध्ये ११३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७४८ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत ८१, पुणे १८, औरंगाबाद ४, अनगर ३, केडीएमसी २, ठाणे २, उस्मानाबाद १, वसई १, इतर राज्यातून आलेला १ असे ११३ रुग्ण आज वाढले आहेत. काल ५२ रुग्ण आढळले होते.


त्यामुळे कालच्या पेक्षा आज कोरोना रुग्णांचा आकडा दुपटीने वाढलेला दिसतोय. पुण्यात आतापर्यंत पाचजण कोरोनामुळे दगावले आहेत. मुंबई आणि पुण्यात कोरोना झपाट्याने वाढताना दिसतोय.