Lata Mangeshkar यांच्या डॉक्टरांनी दिलं हेल्थ अपडेट, म्हणाले...
लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे दक्षिण मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल केलंय.
मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत (Lata Mangeshkar Health update) मोठी माहिती समोर आली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे दक्षिण मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचं हेल्थ अपडेट शेअर केलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतित समदानी यांनी सांगितलं की, लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये असून त्यांच्या प्रकृतीत आज थोडीशी सुधारणा झाल्याचं दिसून आलं.
डॉ. समदानी पुढे म्हणाले, 'त्यांच्यावर औषधांचा परिणाम होतानाही दिसतोय. त्याचप्रमाणे त्या बऱ्या होण्याची चिन्हही दिसतायत.' लता मंगेशकर यांच्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असून त्या लवकरच बऱ्या होतील अशी आशा सर्वांना आहे.
लता मंगेशकर यांच्या हाऊस हेल्परला कोरोना झाला होता. यानंतर लता दीदींनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी एक निवेदन जारी केलेलं. ज्यामध्ये, "प्रत्येकाला आवाहन आहे की, कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवू नका. लता दीदींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परत याव्यात अशी प्रार्थना."