मुंबई : मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या ६ नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ नगरसेवकांच्या पक्षांतराविरोधात, मनसेनं कोकण विभागिय आयुक्तांकडे आक्षेप याचिका नोंदवली होती. त्या ६ नगरसेवकांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये. तसंच हे सर्व नगरसेवक मनसेच्या चिन्हावर निवडून आले असल्यानं त्यांची कृती पक्षविरोधी ठरवत, त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी मनसेनं याचिकेद्वारे केली आहे.


गटाच्या मान्यतेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांच्या वकिलांचे युक्तिवाद आता पूर्ण झाले आहेत. मात्र त्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावर युक्तिवाद अजून बाकी आहे. त्यासाठी लवकरच सुनावणी होणार आहे. त्यानंतर येत्या काही दिवसांत या संपूर्ण याचिकेवर निर्णय येणं अपेक्षित आहे.


पाहा व्हिडिओ