मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Land Scam) जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. संजय राऊत (Sanjay Raut) यांना 1 ऑगस्ट रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली होती. त्यानंतर आज न्यायालयात संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रा चाळघोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा वाढ केली आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे.


ईडीचा युक्तिवाद


संपूर्ण गैरव्यवहारात पडद्यामागून संजय राऊत यांचा हात असल्याचे निदर्शनास येते असा आरोप ईडीकडून युक्तीवाद करणाऱ्या अनिल सिंह यांनी केला. तसेच म्हाडा आणि इतर प्रशासकीय बैठकांसाठी संजय राऊत यांनी त्यांच्या राजकिय हेतूने मदत  केल्याचेही तपासात समोर आलेले आहे. गुरू आशिष कंपनीत प्रवीण राऊत याच्यासोबतचे त्याचे आर्थिक व्यवहार  हेही समोर आले आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधव राऊत  यांच्या बॅक खात्यातूनही वर्षा राऊत यांना पैसे पाठवण्यात आले असल्याचे तपासात समोरआले आहे. दोघांमध्ये झालेल्या व्यवहारातील १ कोटी ६ लाख या पैशांचा हिशोब लागत नाही, असे ईडीने म्हटलं आहे.