COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई: ही कहाणी आहे एका हृदयाच्या हृदयद्रावक प्रवासाची. ज्या हृदयाने एका चिमुकलीसाठी केला आहे चक्क ३२३.३ किलोमीटरचा प्रवास. तोही ३४ मिनीटांत. ही चिमुकली होती अवगी ४ वर्षांची. म्हटलं तर हा प्रवास तितका सोपा आणि जवळचाही नव्हता. पण, तो पार झाला. चिमुकलीला जिवादान मिळाले. दरम्यान, फोर्टिस हॉस्पिटलने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जालना येथील या मुलीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. आता तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.


ग्रीन कॉरिडोअरचा वापर


फोर्टिसने दिलेल्या माहितीनुसार, एका रस्तेअपघातात आपला जीव गमावलेल्या १३ वर्षीय मुलाचे हृदय जिवंत होते. हे हृदय औरंगाबादच्या एमजीएम रूग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आले होते. हॉस्पिटलमधून औरंगाबाद विमानतळाकडे हृदय १.५० मिनिटांनी निघाले. साधारण १.५४ मिनिटांनी हे हृदय विमानतळावर पोहोचले. केवळ चार मिनिटात ४.८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ग्रीन कॉरिडोअर बनविण्यात आला. त्यामुळेच इतक्या कमी वेळात हृदय विमानतळापर्यंत पोहोचू शकले, अशी माहिती हॉस्पिटलने दिली आहे.


चार्टर्ड विमानाने हृदय मुंबईला रवाना


दरम्यान, एका चार्टर्ड विमानाने ३ वाजून ५ मिनिटांनी हे हृदय मुंबई विमानतळावर पोहोचले. तिथून १८ किलोमीटर दूर असलेल्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हे हृदय केवळ १९ मिनीटात पोहोचविण्यात आले. त्यासाठीही ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला  फोर्टिनसे दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'हृदय ३.२४ मिनिटांनी औरंगाबादहून निघाल्यावर एक तास ३४ मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हे अंतर सुमारे २२३.५ किलोमीटर इतके होते'.