मुंबई : मुंबई आणि परिसरात आजही उष्णतेची लाट असणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिलाय. मुंबईत रविवारी मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ इथं रविवारी ४१ डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद झाली. हे तापमान जे नॉर्मल तापमानाच्या ८.२ डिग्री सेल्शियसने अधिक होते. गेल्या १० वर्षात दुस-यांदा ४१ किंवा त्यापेक्षा अधिक डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद झालीय. २०११ मध्ये ४१.३ तर २०१३ मध्ये ४०.५ डिग्री सेल्शियस इतक्या तापमानाची नोंद झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी १९५६च्या मार्च महिन्यात सर्वाधिक ४१.७ डिग्री सेल्शियस तापमानाची नोंद झाली होती. पूर्वेकडून येत असलेल्या जोरदार वा-यामुळं उष्णतेची लाट आलीये. 


उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेर पडताना पाण्याची बाटली अवश्य जवळ ठेवा. तसेच शीतपेय घेण्यापेक्षा नारळपाणी, ताक, लिंबू सरबत प्या. बर्फ घातलेली शीतपेय पिऊ नका.