COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : ऑफीस उरकून घरी चाललेल्या मुंबईकरांचे पुन्हा हाल होणार आहेत. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली. करी रोडपासून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत रेल्वेच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून कल्याणकडे जाणारी वाहतूक मात्र सुरू आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे तिन्ही मार्गांवरच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. रात्रभर झालेल्या पावसानं बोरीवली-विरार दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प आहे. पण बोरीवली ते चर्चगेट लोकल वाहतूक सुमारे २० मिनिटं उशीरानं सुरु आहे.


पुढच्या २४ तासात कुलाबा वेधशाळानं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जोरदार पाऊस आणि आणखी 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्यात जिथे पाणी साचलं असेल तिथे शांळांना सुट्टी देण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.