मुंबई : केरळात मान्सून दाखल  झालाय. येत्या १० ते १२ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. राज्यात येत्या २ ते ४ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते. ते म्हणाले की, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असून यंदा एल निनोचा प्रभाव राहणार नाही. 


दरम्यान, वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून आणि जुलै महिन्यात पावसात खंड पडेल. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.