मुंबई : अधिकृतरित्या मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागान खात्याने केली आहे. सकाळपासून उपनगरात पावसाची संततधार सुरू होती. आता मुंबई शहरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दादर, परळ, हिंदमाता, लोअर परळ, वरळी भागात जोरदार पाऊस पडत आहे हिंदमाता परिसरात पाणी तुंबायला सुरूवात झाली आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरू आहे. आज शनिवार असल्यानं रस्त्यांवर आणि लोकल गाड्यांना फारशी गर्दी नाही आहे. दरम्यान येत्या २४ तासात मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. 



पावसाचा फटका लोकल ट्रेनला बसला आहे. तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे 35 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहे. तसेच दादर, परेल, हिंदमाता परिसरात पाणी भरल्यामुळे रोड ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. तसेच पावसात चालताना नागरिकांना काळजी घ्यावी. रस्त्याच्या मधून चालावे.