मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून मुंबई शहर आणि उपनगराच चांगला पाऊस रात्री झाला. तर नवी मुंबई, अंबरनाथ , बदलापूरमध्ये जोरदार पाऊस बरसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विलेपार्ले, सांताक्रूझ, खार, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात जोरदार पाऊस रात्री पडत आहे.  तसेच राज्यात  सोलापूर, पंढरपूरला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. सलग दोन तासांच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडला.


मालेगाव तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, एक जखमी झाला. टोकडे येथील समाधान बहादुरसिंग सुमेरो आणि गरबड़ येथील सुनंदा दिनकर गायकवाड यांचा मृत्यू तर सावित्री माळी या जखमी झाल्यात. वीज पडून तालुक्यातील वेगवेगळ्या गावात एकूण 10 जनावरे दगावली आहेत.


दरम्यान, मान्सून केरळात दाखल झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून तो पुढे सरकत नव्हता. मात्र, आज राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी  शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात येत्या २४ तासात पावसाचा इशारा देण्यात आलाय.