मुंबईला मुसळधार पावसाचा फटका, विमानसेवाही ठप्प
मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.
मुंबई : मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.
शहरात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने पाण्यातून रस्ता शोधण्याची वेळ वाहनधारकांवर आलेय. रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.
जोरदार पावसामुळे नेहमी धावणाऱ्या मुंबईचा वेग आज मंदावलेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर शाळांना सुटी जाहीर करण्यात आलेय. तसेच काही कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात आले आहे.
पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपले आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचे स्वरुप आले आहे. गेल्या २४ तासात १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात
दरम्यान, कसारा येथे रुळावरील माती बाजुला करताना डोक्यात ओव्हरहेड वायर पडल्याने रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सीएसटी ते टिटवाळा आणि कसारा ते आसनगाव लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही अन्य मार्गे वळवल्या आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत होण्यास उद्याची सकाळ उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.
मुंबई हून सुटणाऱ्या गाड्या पुणेमार्गे मनमाडला वळवण्यात आल्या आहेत.
- 12859- सीएसटी-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- 17617- मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस
-12336- एल टी टी-भागलपुर एक्सप्रेस
- 15017- एलटीटी- वाराणसी काशी एक्सप्रेस
- 22129- एलटीटी - अलाबाद तुलसी एक्सप्रेस
मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका रेल्वेला बसला आहे. सायन येथे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. तसेच पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मनमाड स्थानकावर सेवाग्राम आणि जनशताब्दी एक्सप्रेस थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकड़ून कुठल्याही पुढील प्रवासाबाबत मार्गदर्शन होत नसल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत.