मुंबई : मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वय वर्ष अवघे २२ असलेली एक मॉडेल हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचे पुढे आले आहे. ही मॉडेल अभिनय क्षेत्रात नाव मिळवू पाहणाऱ्या तरूणींना जाळ्यात ओढायची आणि सेक्स रॅकेट चालवायची.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मॉडेल या तरूणींना मोठ्ठ्या रकमेचे अमिषही दाखवत असे. त्यातून अनेक मुली तिच्या जाळ्यात अडकायच्या. बुधवारी रात्री ओशिवारा कंपनीने हा कारवाई करत या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. प्राप्त माहितीनुसार, ही मॉडेल मुळची पश्चिम बंगालची आहे. भारतातील अनेक मुली अभिनेत्री होण्याची जशी स्वप्ने पाहात तशीच स्वप्ने पाहात ही मॉडेल देखील मुंबईत आली. अनेक ठिकाणी धडका मारूनही तिला हवा तसा ब्रेक मिळत नव्हता. त्यामुळे काही मालिका, चित्रपटांत मिळतील त्या छोट्या मोठ्या भूमिका आणि स्टेज शो करत ती आपली उदरनिर्वाह करत असे.


या रॅकेटमध्ये गुंतलेली ही मॉडेल आपल्या बॉयफ्रेंडसोबत ओशिवरा परिसरात राहते. तिला उच्चभ्रू रहायला आवडते. या आवडीतूनच तिने कॉलवर जायला सुरूवात केली. यातून तिला चांगले पैसे मिळू लागले. हे पैसे पाहून तिच्या बॉयफ्रेंडने तिला विश्वासात घेतले आणी सेक्स रॅकेट चालवण्याची कल्पना तिच्यासमोर मांडली. तिनेही या कल्पनेला होकार भरत सेक्स रॅकेट चालविण्यास पसंती दिली. ती होतकरू असलेल्या पण आर्थिक विवंचनेत असलेल्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढायची त्यांना चित्रपटात काम मिळेपर्यंत स्टेज शो वगैरेतून पैसे कमवा असा सल्ला द्यायची. पुढे जसजशी जवळीक वाढेल तसतशी मॉडेलना सेक्स रॅकेटमध्ये ढकलायची. याद्वारे तिने चांगलेच बस्तान बसविले होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले.