मुंबई : येत्या २-३ महिन्यात सण असल्याने मुंबईतील बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक उत्सव ठिकाणी लोकांची गर्दी लक्षात घेऊन घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी  केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबई पोलिसांनी सणांवरील दहशतवादचं सावट दूर व्हावं याकरता कंबर कसली आहे. दहिहंडी आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आल्याने लोकांनी अनेक ठिकाणी मोठी गर्दी केली होती. पण, मुंबई पोलिसांनी डोळ्यात तेल घालून सुरक्षा केल्याने एकही अनुचित प्रकार घडला नाही. 


सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट घोषित केलाय. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आणि दिवाळी सारखे मोठे उत्सव जे पुढील काही महिन्यात आहेत, ते दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. कारण या सणांच्या दिवसात मुंबईतल्या रस्त्यांवर मुंबईकर प्रचंड गर्दी करतात, याचा फायदा दहशतवादी घेऊ शकतात, असा इशारा पोलिसांनी दिलाय.


या परिस्थितीत मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष योजना तयार करुन नागरिक आणि सार्वजनिक उत्सव मंडळांकरिता  मार्गदर्शन तत्वे जारी केलीत. तसेच
मुंबई पोलिसांनी मुंबईत एकूण ७४१ ठिकाणे संवेदनशील म्हणून घोषीत केली आहेत. या ठिकाणांना दहशतवादी टार्गेट करु शकतील, अशी शक्यता वर्तविण्यात आलेय.


७४१ पैकी १२८ संवेदनशील ठिकाणे आहेत दक्षिण मुंबईत. सर्वच वस्तूंचे होलसेल मार्केट या भागात असल्याने या भागात एकूण १०६ पेक्षा जास्त ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. आणि या भागातील सर्व धर्मांच्या संघटनांचेही सहकार्य घेण्यात येत आहे.


उत्सवाचं मंगलमय वातावरणाला कुठे गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी मुंबई पोलीस सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडेकरुंची तपासणी करत आहेत.


अशी घेणार खबरदारी... 


- स्वत: मुंबई पोलीस आयुक्त बंदोबस्ता करता रस्त्यावर उतरणार
- सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था देवेन भारती यांच्यासह एकूण ४ सहपोलीस आयुक्त पुढील काही महिने सुरक्षेवर लक्ष ठेवण्याकरिता सतत गस्तीवर असणार
- चारही झोनच्या अतिरिक्त आयुक्तांसह ६ अतिरिक्त आयुक्त, २० डीसीपी या वरीष्ठ अधिका-यांसह हजारोंची मुंबई पोलीसांची फोर्स देखील सुरक्षिततेकरता तैनात केली जाणार
- शिवाय वाहतूक पोलिस ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रीत करण्या करता तैनात असणार
- तर राज्य राखीव दलाच्या कंपण्या देखील महत्वाच्या ठिकाणी तैनात करणार येणारेत
- सर्व पोलीसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत
- तर साध्या वेशात पोलीस गर्दीच्या ठिकाणी शामील होणारे असून समुद्र किना-यांवर देखील हायअलर्ट घोषीत करण्यात आलाय.