मुंबई : राज्य सहकारी बँक कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दणका दिलाय. अजित पवार यांच्यासह सुमारे १५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्याचं हे प्रकरण आहे. अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार, आनंदराव अडसूळ, प्रसाद तनपुरे अशा अनेक बड्या नावांचा या गैरव्यवहारात समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ५ दिवसांत त्यांच्याविरोधात आर्थिक गुन्हा शाखेनं गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. सुरिंदर अरोरा यांनी २०१२ मध्ये या गैरव्यवहाराबाबत याचिका दाखल केली होती.


या नेत्यांवर होणार गुन्हे दाखल


अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील, हसन मुश्रीफ, प्रसाद तनपुरे, दिवंगत सदाशिवराव मंडलिक, दिवंगत पांडूरंग फुंडकर, मिनाक्षी पाटील, आनंदराव अडसूळ, जगन्नाथ पाटील, तानाजीराव चोरगे, जयंत पाटील, जयंतराव आवळे, दिलीप सोपल, राजन तेली, विलासराव जगताप, रजनीताई पाटील, माणिकराव कोकाटे