मुंबई : अभिनेता सोनू सूद आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण कोरोनावरील औषधं पुरवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं सोनू सूद आणि झिशान सिद्दीकी यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीचे निर्देश देताना कोर्टानं अभिनेता सोनू सूदवर ताशेरे ओढलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे लोक लोकांना मदत करताना स्वत:ला मसिहा भासवतात असं न्यायमूर्ती म्हणाले. अभिनेता सोनू सूद आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी अनेक लोकांना कोरोनाची औषधं वाटली. पण राज्यात कोरोना औषधांचा तुटवडा असताना त्यांनी ही औषधं कुठून कशी मिळवली, यासाठी कोणत्या अवैध पद्धतीचं वापर केला नाही ना याची चौकशी करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं आपल्या सुनावणीदरम्यान दिलेत. 


या प्रकरणात पुढची सुनावणी 25 तारखेला होणार आहे. त्यामुळे कोर्ट या प्रकरणात काय निर्णय देत आणि चौकशीत काय पुढे येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनपासून लोकांना मदत करताना दिसत आहे. अजूनही त्याच्याकडून मदतीचा ओघ सुरु आहे.