मुंबई : कोर्टाने अखेर  पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच कोर्टाने गुंतवणुकदारांची देखील माफी मागितली आहे, डीएसके यांनी सांगितलेल्या वेळेत ते पैसे जमा न करू शकल्याने, कोर्टावर गुंतवणुकदारांची माफी मागण्याची वेळ आली आहे.


गुंतवणुकदारांमुळे मूभा दिली होती-कोर्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण गुंतवणूकदांसाठीच तुम्हाला पैसे जमा करण्याच्या बाबतीत काही दिवसांची मूभा दिली होती, तुम्ही कोर्टाशी खोटं बोलले, तुम्ही कोर्टाला फसवलं, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, फक्त गुंतवणूकदारांसाठी, असंही कोर्टानं म्हटलं आहे.


कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता 


डीएसके यांनी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने डीएसकेंना ख़डे बोल सुनावले आहेत. कोर्टाची तुम्ही फसवणूक करत आहात. तुम्हाला गुंतवणूक दारांकडे पाहून बरीच मुभा दिली. असं हायकोर्टानो म्हटलंय. 


डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश


तसंच डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वीच आपण पासपोर्ट जमा केल्याचं सांगितल्यानंतर, सांगता येत नाही, तुमच्याकडे दोन पासपोर्ट देखील असतील, अशा शब्दात कोर्टाने डीएसकेंना सुनावत आपला विश्वास नसल्याचं सांगितलं आहे.