मुंबई : दहीहंडीच्या सणावर घालण्यात आलेले वय आणि उंचीचे विधीमंडळानं ठरवावेत असा निर्णय आज मुंबई उच्चन्यायालयानं दिला आहे. त्यामुळे आता  सरकारनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार १४ वर्षाखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय दहीहंडीची उंची किती असावी याचा निर्णयही सरकार आणि विधीमंडळानं घ्यावा असंही हायकोर्टानं म्हटलंय. त्याआधी आज सकाळपासून दहीहंडीच्या उंची आणि वयाच्या निर्बंधांविषयी सुनावणी झाली. त्यात राज्यसरकारानं गोविंदांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या आदेशांची माहिती कोर्टात मांडली. त्यात प्रामुख्यानं गोविंदांसाठी हेल्मेट, सेफ्टीबेल्ट देणे याची जबाबदारी आयोजकांवर देण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं.


शिवाय दहीहंडीतले थर हे संस्कृतीचा भाग असल्याचंही सरकारच्या वकिलांनी म्हटलं.  त्यानंतर कोर्टानं मृत्यू यायचा असेल, तर तो ट्रेडमिलवरही येऊ शकतो असं निरीक्षण नोदंवलं आणि जवळपास सगळचे निर्बंध हटवले आहेत.