Anil Deshmukh : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्या जामीन अर्जावर (bail application आज निर्णय होणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने (High court) बुधवारी राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) फटकारल्यानंतर दोन दिवसांत सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाच्या (High court) एकलपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. मात्र त्या वेळी याचिका सादर न करता थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरूनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज जामीन अर्जावर (bail application) आज निर्णय होणार आहे. (high Court verdict on Anil Deshmukh bail application today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीला वेळ लावल्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाला फटकारले होते. तसेच देशमुख यांच्या जामीन याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर देशमुख यांच्या जामीन याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यात आली. मंगळवारी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवाद पूर्ण केला.


त्यानंतर बुधवारी ईडीतर्फे (ED) अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी युक्तिवाद करत देशमुख यांना जामीन देण्यास विरोध केला. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार, अधिकृत पदाचा गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहारासारखे गंभीर गुन्हे  असल्याचे अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना सांगितले. आर्थिक गैरव्यवहार हा गंभीर गुन्हा आहे आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.  यावर आता उच्च न्यायालयात निर्णय होणार आहे.


अनिल देशमुखांविरोधात आरोप काय?


अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला.


ईडीच्या आरोपांनुसार, सचिन वाझेने मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. हवालाद्वारे हे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते. ते दोघेही बनावट कंपन्या चालवत होते. जैन यांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीने केला आहे.