VIDEO: समुद्राला भरती; मरिन ड्राईव्हवर उसळतायतं उंचच उंच लाटा
मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा उसळत आहेत.
मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. समुद्राला भरती आली असून मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा उसळत आहेत. हवामान विभागाने रविवारी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी भरतीची शक्यता वर्तवली होती. तसंच 4.7 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचाही अंदाज वर्तवला होता. मरिन ड्राईव्हवर समुद्राच्या लाटा उंच उसळत असल्याचा व्हिडिओ ANI वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.
मुंबईत सतत सुरु असलेल्या पावसाने मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील सायन, हिंदमाता आणि इतर अनेक सखल भागात पाणी भरत असल्याने, या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी महापालिकेकडून तयारी करण्यात आली आहे. पालिकेकडून सखल भागात पंपिंग मशीन लावण्यात आल्या असून पाणी काढण्याचं काम सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत कुलाबा येथे 129.6 मिमी आणि सांताक्रुझ येथे 200.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
मुंबईत पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही पावसाची सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघर, कोकण भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पाऊस आला मोठा...