मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आज राज्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. दिवसभरात राज्यात नव्या 19 हजार 218 कोरोनाग्रस्तांचं निदान झालं आहे. तर 378 जणांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात 13 हजार 289 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण होण्याचं प्रमाण आता 72.51 टक्के इतकं झालं आहे.


राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 8 लाख 63 हजार 62 इतका झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण 6 लाख 25 हजार 773 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 2 लाख 10 हजार 978 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 



कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत 25 हजार 964 जणांचा बळी गेला आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 3.01 टक्के इतका आहे. 


महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या एकट्या मुंबईत आहे. आज मुंबईत कोरोनाचे नवे 1929 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 1,52,024 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,21,671 रुग्ण बरे झाले आहेत. तर 7799 जण दगावले आहे. सध्या मुंबईत 22,222 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.