मिरारोड : गल्लीबोळात चुटकीसरखी जाऊन कायदा सुव्यवस्थेवर तात्काळ नियंत्रण मिळवणारी हायटेक पोलीस बाईक ठाणे ग्रामीण पोलीस दलात दाखल झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात ही हायटेक बाईक आलीय. अशा आणखी दहा बाईक ठाणे ग्रामीण पोलीस दलात येणार आहेत. मिरा-भाईंदर शहरातील पाच पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक याप्रमाणे पाच बाईक दिल्या आहेत. 


नागरिकांशी संवाद संभाषण साधू शकेल अशी माईक सिस्टीम यात आहे. पब्लिक अड्रेस सिस्टीम आहे. तर सायरनही आहे. फर्स्ट एड बॉक्स, रेनकोट, टॉर्च ठेवण्याची जागा यात आहे. अर्थात बाईक दाखल झाल्या असल्या तरी त्या चालवण्यासाठी आयत्यावेळी पेट्रोल असणं आवश्यक आहे. बाईक उदघाटनाच्या वेळी तीन बाईकमध्ये पेट्रोलचं नव्हते. त्यामुळे त्या बाईक सुरूच झाल्या नाहीत.