मुंबई : Karnataka Hijab Controversy : हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केले आहे. राज्यात विनाकरण सामाजिक वातावरण खराब होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच शाळा आणि संस्थांनीही नियम सर्वांनी पाळले पाहिजे, असे पाटील म्हणालेत. दरम्यान, हिजाब वादाला आता हिंदू-मुस्लीमचा रंग देण्यात येत आहे. ( Hijab Controversy) मुंबईत आज होणाऱ्या निदर्शनांच्या व्हायरल पोस्टर्समध्ये से नो टू हिंदू राष्ट्रचा उल्लेख करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिजाबच्या वाद आता थेट हिंदू राष्ट्रापर्यंत येऊन पोहचला आहे. हिजाबच्या समर्थनात मुंबईत आज निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यासाठी जे पोस्टर तयार करण्यात आले आहेत त्यावर 'से नो टू हिंदू राष्ट्र' असा वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे आणि हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. 



हिजाब वादाप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश दिला आहे. 'धार्मिक पेहराव घालून शाळा-कॉलेजात येऊ नका, असे कोर्टाने म्हटले आहे. यासंदर्भात कर्नाटक हायकोर्ट लवकरच अंतिम निकाल सुनावणार आहे. निकाल येईपर्यंत 'धार्मिक पेहराव घालून शाळा-कॉलेजात येऊ नका या आदेशाचं पालन करा, असे आदेश कोर्टाने दिले आहे. 



कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे सोलापुरातही पडसाद पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरात हिजाब बंदीविरोधात निदर्शने झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. 


जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालया समोर हिजाब समर्थक मुस्लीम नुमाइंदा खवातीनच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 'पहले हिजाब, फिर किताब' अशा जोरदार घोषणा हिजाब समर्थक आंदोलक महिलांनी दिल्या. यावेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी करून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला.