मुंबई : बाजारात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. भाज्यांच्या वाढत्या दरांमुळे महिलांचं महिन्याचं बजेट कोडमडलं आहे. अवकाळी पावसाने सर्वच भाजीपाल्याचं नुकसान झालं आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेंडी - ५० रू. किलो
फ्लॉवर - ४० रू.किलो
दुधी - ४० रू. नग
कांदे - ६० रू. किलो
गाजर - ५० रू. किलो
बीट - ४० रू. किलो
टोमॅटो - ३५ रू. किलो
कोथिंबीर जुडी - ५० रू. जुडी


  


वाढलेल्या किंमतीत भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहक टाळाटाळ करत असल्याचं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. पावसाने, शेतकऱ्यांच्या शेतातली पिकं आडवी झाली. तर, इथे सर्वसामान्यांनाचे खिसे जीवनावश्यक वस्तूंसाठी रिकामे होत आहेत.


कांद्याच्या दराने शंभरी पार केली आहे. परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे शंभर रुपयांच्यावर दर गेले आहेत. याआधीचा कांद्याचा दर ७० ते ८० रुपये होता. आता तर कांद्याने शंभरी पार केली आहे. अवकाळी पावसाने कांद्याचं नुकसान झालं आहे. नवा कांदा  बाजारात येण्यास उशीर होत असल्याने कांद्याचे भाव कडाडले आहेत. 


नवी मुंबईतील कृषी बाजार समितीमध्ये धान्याची आवक घटली आहे. पावसामुळे धान्य भिजल्याने धान्याची प्रतही घटली आहे. आवक घटल्याने बाजार भावही ८ ते १० रुपयांनी वाढलेत.