मुंबई : माजी एटीएस प्रमुख आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या पार्थिवावर काल रात्री दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रॉय यांनी मलबार हिल येथील त्यांच्या निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रॉय यांनी सुसाइड नोट लिहिली होती. या नोटनुसार रॉय यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं उघड झालंय. कॅन्सरच्या आजाराला कंटाळून मृत्यूला कवटाळल्याचं रॉय़ यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय. आपल्या मृत्यूला कुणालाही जबाबदारी धरू नये असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंह यांनी मात्र रॉय यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केलीय.


अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय  यांनी आत्महत्या केलीय. स्वत:च्या पिस्तूलनं गोळ्या झाडून रॉ़य यांनी जीवन संपवलं. गेल्या काही काळापासून रॉय हे दुर्धर आजारानं त्रस्त होते. हिमांशू रॉय १९८८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. तसंच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. सध्या ते  आस्थापनाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक या पदावर कार्यरत होते.