मुंबई : महाराष्ट्राचे माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येची सुसाईड नोट देखील मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी लिहिलं असल्याचं, मुंबई पोलिसांनी अधिकृत पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. हिमांशू रॉय यांच्या बेडरूममध्ये ही नोट सापडली आहे. हिमांशू रॉय यांच्या मृत्युनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, पण मुंबई पोलिसांनी अधिकृत माहिती दिल्यानंतर, आता तर्कवितर्क निश्चितच बंद होणार आहेत.


कॅन्सरवर मागील २ वर्षापासून उपचार


हिमांशू रॉय यांना बोन मॅरो कॅन्सर होता, कॅन्सरवर मागील २ वर्षापासून उपचार सुरू होते, हिमांशू रॉय यांचा कॅन्सर बरा होत असल्याचंही सांगण्यात येत होतं, मात्र यानंतर आणखी कॅन्सरने वर डोकं काढल्याने, त्यांनी नैराश्यात आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. हिमांशू रॉय यांच्या मृत्यूने पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल गुन्हे उघड केले होते.