Hinduja Group Invest in Maharashtra : मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती करणारे अनेक बडे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर(Maharashtra) गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली देखील होती. आता लवकरच  महाराष्ट्रात मोठी रोजगार निर्मीती होणार आहे.  हिंदुजा समूह (Hinduja Group)महाराष्ट्रात  35 हजार कोटीची गुंतवणूक करणार आहे. यामाध्यमातून महाराष्ट्रात दीड लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत.  लवकरच महाराष्ट्रात बडे उद्योग येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून ( Shinde - Fadnavis Government )  करण्यात आली होती. या अनुषंगाने घडामोडी पहायला मिळत आहेत. हिंदुजा समूह महाराष्ट्रात गुंतवणुक करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र शासनाचा हिंदुजा ग्रुप सोबत सामंज्यंस्य करार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हिंदुजा गुपचे मुख्य अधिकारी यांच्या सोबत हा करार झाला.  हिंदूजा ग्रुप महाराष्टात एकूण 12 क्षेत्रात ही गुंतवणूक करणार आहे. यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सायबर, मनोरंजन, नवीन टेक्नॉलॉजी, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग यात ही गुंतवणूक असणार अशी माहिती हिंदुजा समूहाचे मुख्य जी पी हिंदुजा यांनी दिली आहे.


मागील महिन्यात लंडनमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये एक गुंतवणूक विषयक सेमिनार पार पडला. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. त्याला हिंदुजा समूहाने प्रतिसाद देत ही गुंतवणूक केली असल्याचे हिंदुजा समूहाचे जी पी हिंदुजा आणि अशोक हिंदुजा यांनी सांगितले. वर्षा बंगल्यावर हा सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असून यातून दीड लाख रोजगार उपलब्ध होणार अशी माहिती हिंदूजा समूहाने दिली.


वेदांता-फॉक्सकॉन(Vedanta-Foxconn), बल्क ड्रग पार्क(Bulk Drug Park),  मेडिसिन डिव्हाईस पार्क(Medicine Device Park) यांसारखे बडे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला होता. विरोधकांच्या आरोपानंतर महाराष्ट्रात अनेक बडे प्रकल्प येणार असल्याचे आश्वासन शिंदे-फडणवीस सरकारने दिले होते. यानंतर हिंदुजा ग्रुपने महारष्ट्रात गुंतवणुक करण्याचा घोषणा केली आहे.